..हा तर महाठग! पुण्यात OLX वर स्कूटर विकून पुन्हा तीच केली लंपास

पुण्यात विमान नगरमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म OLX वरुन ग्राहकाला बाईक विकल्यानंतर आरोपीने पुन्हा तीच बाईक चोरली. पुण्यात विमान नगरमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. आरोपीची ओळख पटली असून दर्शन अग्रवाल असे त्याचे नाव आहे. तो वाघोली येथे राहतो. येरवडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आरोपीने OLX वर वेस्पा स्कूटर विक्रीची जाहीरात दिली होती. विक्रीसाठी त्याने ६१ हजार रुपये किंमत ठरवली होती. डेक्कन रोड येथे रहाणाऱ्या प्रदीप नागरगोजेला दुचाकी विकत घ्याचची होती. त्याने OLX वर ही जाहीरात पाहिली व दर्शन अग्रवालशी संपर्क साधला. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

विक्री करणाऱ्या अग्रवालने नागरगोजेला बाईक पाहण्यासाठी विमान नगर येथे बोलावले. नागरगोजेने बाईक चालवून बघितली व दोघांमध्ये डील निश्चित झाले. नागरगोजेने अग्रवालच्या बँक खात्यात गुगल पे ने ३० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघे चहा पिण्यासाठी म्हणून हॉटेलमध्ये गेले.

चहा पीत असताना फोन आल्याचे कारण देऊन अग्रवाल दुसऱ्या दाराने बाहेर आला. त्याच्याकडे स्कूटरची डुप्लीकेट चावी होती. त्या चावीने त्याने स्कूटर चालू केली व तिथून पसार झाला. आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही जणांना फसवल्याचे समोर आले.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man sells scooter on olx later steals it again dmp

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या