शिवाजीनगर येथील संचेती पुलावरुन एकाने उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. शोले चित्रपटातील दृश्याप्रमाणे तरुणाने उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणाची संचेती पुलावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी संचेती पुलावरुन एक तरुण थांबला असून त्याने उडी मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दुपारी मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तरुणाची पोलिसांनी समजूत घातली. दरम्यान, या घटनेमुळे संचेती पूल परिसरात बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.