Premium

Video : संचेती पुलावर चढून तरुणाची ‘स्टंटबाजी’

या घटनेमुळे संचेती पूल परिसरात बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

man threatened to commit suicide
उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली image credit : महेंद्र डावखर

शिवाजीनगर येथील संचेती पुलावरुन एकाने उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. शोले चित्रपटातील दृश्याप्रमाणे तरुणाने उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/pune-vid.mp4
तरुणाची संचेती पुलावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी

संचेती पुलावरुन एक तरुण थांबला असून त्याने उडी मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दुपारी मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तरुणाची पोलिसांनी समजूत घातली. दरम्यान, या घटनेमुळे संचेती पूल परिसरात बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 18:10 IST
Next Story
पुणे: जनता वसाहतीत टोळक्याची दहशत; तरुणावर शस्त्राने वार