फुकट अंडा राईस न दिल्याने हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या एकास पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या सराइताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली.बंड्या उर्फ काळुराम प्रशांत थोरवे (वय ३०, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात ही घटना घडली होती.

हेही वाचा >>> पुणे :पुण्याभोवती आता सिमेंटची जंगले; गावठाणापासून २०० मीटरच्या आतील जमीन अकृषिक करण्याची मोहीम

Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराची स्वारगेट एसटी स्थानक परिसरात अंडा भुर्जीची गाडी आहे. बंड्या फिर्यादीचा ओळखीचा असून त्याने फूकट अंडाराईस मागितला. फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यामुळे बंड्या चिडला आणि त्याने फिर्यादीवर पिस्तूल रोखले. गल्ल्यातील अडीच हजार रुपये लुटून तो पसार झाला. बंड्या हा गुलटेकडी भागात थांबल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मि‌ळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त करण्यात आली.   वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारू, सोमनाथ कांबळे, अनिस शेख आदींनी ही कारवाई केली.