पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. आंदेकर यांचा खून वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून झाल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात आंदेकर यांची बहीण संजीवनी, कोमकर, मेहुणे जयंत, प्रकाश, गणेश, तसेच गुंड सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते मुख्य सूत्रधार आहेत. गेल्या वर्षी गायकवाडचा मित्र निखिल आखाडेचा आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आंदेकर यांचा बहीण संजीवनीशी वाद झाला होता. वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून आरोपींनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून पिस्तुले, कोयते, महागडी मोटार, दुचाकी जप्त करण्यात आली होती. आरोपींना एनडीए रस्त्यावरील गुंड अभिषेक खोंड याने पिस्तूल पुरविल्याची माहिती पोलीस कर्मचारी निलेश साबळे आणि दत्ता सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.

pro kabaddi shivam pathare
जो तंदुरुस्त तोच मॅटवर टिकणार – शिवम पठारे
pune nagar road firing
पुणे : दारुच्या नशेत रुग्णवाहिकेवर गोळीबार, व्यसनमुक्ती केंद्रातील…
State government step to increase exports
निर्यात वाढविण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल! थेट उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद
Yewalewadi factory fire news in marathi
येवलेवाडीत सोफा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात आग लागून कामगाराचा मृत्यू ; शहरात दिवसभरात आगीच्या चार घटना
pimpri chinchwad police commissioner VinayKumar Choubey inaugurate dispensary for police | कौतुकास्पद:
कौतुकास्पद: पोलिसांसाठी आता ‘पोलीस दवाखाना’; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
Stem cell transplantation cures girl of thalassemia
पुण्यात चिमुकली बनली सर्वांत कमी वयाची मूळ पेशीदाता! २१ महिन्यांच्या मुलीच्या दानामुळे बहिणीला जीवदान
pune recorded highest increase in house prices of 37 percent in wagholi area
पुण्यात घरांच्या किमती वाढता वाढता वाढे…! सर्वाधिक वाढ कोणत्या भागात जाणून घ्या…
Attempted robbery at knifepoint of security guard at bank in Market Yard
मार्केट यार्डातील बँकेत सुरक्षारक्षकाला चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा
Police who came to take possession were beaten up
पिंपरी : ताबा घेण्याच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा – मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

हेही वाचा – खबरदार…! रस्त्यावर न दिसल्यास होणार कारवाई, आयुक्तांचा इशारा

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, सहायक फौजदार राहुल मखरे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader