लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरत असून, गेल्या चार वर्षांत मांजात अडकलेल्या १६० पक्ष्यांची सुटका करण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. मात्र, एका पक्ष्याला जीव गमवावा लागला.

Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Himalayan vulture loksatta news
Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

बाजारात बंदी असतानादेखील दर वर्षी नायलॉन मांजाची विक्री होते. त्यामुळे पक्ष्यांना फास लागण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. गेल्या चार वर्षांत १६० पक्ष्यांना अग्निशामक दलामुळे जीवदान मिळाले, तर एका पक्ष्याला प्राण गमवावा लागला. फास लागलेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक कबुतरे, त्या पाठोपाठ कावळ्यांची संख्या आहे. दलाच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून पक्ष्यांची सुटका करावी लागते. अनेक कर्मचारी कर्तव्य बजावत असताना जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या चार वर्षांत अग्निशामक दलाने नायलॉन मांजाच्या फासातून १६० पक्ष्यांची सुटका केली आहे.

आणखी वाचा-‘पुरंदर’ विमानतळाचे लवकरच टेक ऑफ

५४ मीटर ‘शिडी’चा वापर

पक्षी झाडावर असलेल्या मांजामध्ये अडकतात. अशा ठिकाणी फांद्यावर जाणे कर्मचाऱ्यांना शक्य नसते. काही ठिकाणी मोठ्या काठीला विळा बांधून मांजा कापला जातो. मात्र, त्यातून पक्षी उंचावरून पडून मृत होण्याची शक्यता असते. त्यामुळे अग्निशामक दलाकडून ५४ मीटर उंच असलेल्या ‘शिडी’चा वापर केला जातो.

२३९ प्राण्यांची सुटका

अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत २३९ प्राण्यांची सुटका केल्याची नोंद आहे. २०२३ मध्ये मांजामुळे दहा जनावरे दगावली.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम

मागील चार वर्षांत सुटका केलेल्या पक्षी, प्राण्यांची संख्या

वर्षपक्षीप्राणी
२०२१३२६३
२०२२४०८०
२०२३४४४२
२०२४४४५४
एकूण१६०२३९

नायलॉन मांजाची विक्री, वापर करण्यास बंदी आहे. कोणी दुकानदार त्याची विक्री करीत असताना आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.

Story img Loader