पुणे : सुवर्ण गुंतवणूक योजनेत परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी कौस्तुभ मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला.

कॉसमॉस बँकेकडून ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्या प्रकरणी मराठे ज्वेलर्स आणि प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींनी बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केली नसल्याने बँकेकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. या प्रकरणी मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४), मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८), नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

मंजिरी मराठे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जास सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर यांनी विरोध केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना अटक करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद ॲड. वाडेकर यांनी केला. त्यानंतर न्यायलयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.