पुणे : सुवर्ण गुंतवणूक योजनेत परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी कौस्तुभ मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉसमॉस बँकेकडून ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्या प्रकरणी मराठे ज्वेलर्स आणि प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींनी बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केली नसल्याने बँकेकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. या प्रकरणी मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४), मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८), नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjiri marathe of marathe jewellers denied pre arrest bail print pune news zws
First published on: 28-06-2022 at 22:08 IST