scorecardresearch

Premium

मिचौंग चक्रीवादळाचा तडाखा! पुणे विमानतळावरील अनेक विमाने रद्द; रेल्वेसेवेलाही फटका

मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे चेन्नई विमानतळ मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे.

many flights at pune airport cancelled due to cyclone michaung hits
पुणे विमानतळ (संग्रहित छायाचित्र)

पुणे :  मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत अतिवृष्टी झाली असून, चेन्नई विमानतळही बंद करण्यात आले आहे. यामुळे पुण्याहून चेन्नईला जाणारी आणि तेथून येणारी १२ विमाने सोमवारी रद्द करण्यात आली. याचबकोबर चेन्नईला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या काही रेल्वे गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

चेन्नईतील विमानतळ बंद करण्यात आल्याने चेन्नईला जाणारी ६ विमाने आणि तेथून येणारी ६ विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. ही सर्व विमाने इंडिगो कंपनीची होती. त्यात चेन्नई – पुणे, मंगळुरू – पुणे, हैदराबाद – पुणे, नागपूर – पुणे, पुणे – बंगळुरू, पुणे – चेन्नई, पुणे – नागपूर आणि पुणे -मंगळुरू या विमानांचा समावेश आहे.

kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Eknath shinde devendra fadnavis 2
“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही”, लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक; म्हणाले, “आमच्याबरोबर दगाफटका…”
rohit pawar, baramati, lok sabha, supriya sule, sunetra pawar, ajit pawar, sharad pawar, maharashtra politics,
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

हेही वाचा >>> उजनी धरणातील मासेमारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ कठोर निर्णय

मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे चेन्नई विमानतळ मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. पावसामुळे चेन्नईतील विमान व रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. विमाने रद्द होण्यामुळे हजारो प्रवाशांच्या प्रवासाच्या योजनेवर पाणी फिरले. पुणे विमानतळ प्रशासनाकडून चेन्नईतील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. आगामी स्थितीनुसार आणखी विमाने रद्द केली जाण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने मुंबई -चेन्नई सेंट्रल ही गाडी अरक्कोनमपर्यंत चालविण्याचे जाहीर केले आहे. ती पुढे चेन्नईपर्यंत जाणार नाही. याचबरोबर चेन्नई सेंट्रल – मुंबई ही गाडी चेन्नईऐवजी अरक्कोनम येथून सुटणार आहे. हे बदल तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले असून, स्थिती सुधारल्यानंतर नेहमीप्रमाणे या गाड्या धावतील,  अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Many flights at pune airport cancelled due to cyclone michaung hits pune print news stj 05 zws

First published on: 04-12-2023 at 21:22 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×