शहरातील सर्व पेठा, डेक्कन, लष्कर भागातील रस्त्यांचा समावेश

मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर आज (२५ सप्टेंबर) सकाळी सात वाजल्यापासून शहरातील मध्यभाग, डेक्कन आणि लष्कर भागातील विविध रस्ते आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत शहरातील वाहतुकीचा वेग कमी होईल. लोहगांव  विमानतळ, रेल्वेस्थानक येथे जाणाऱ्या नागरिकांनी बाह्य़वळण मार्गाचा वापर करुन इच्छितस्थळी पोहोचावे.जसजसा मोर्चा पुढे जाईल तसतसे वाहतूक पोलिसांकडून रस्ते वाहतुकीसाठी खुले करुन देण्यात येणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उद्या  सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ होईल. तेथून विधान भवनापर्यंत मोर्चा जाणार आहे. हे अंतर सुमारे साडेपाच किलोमीटरचे आहे. सकाळपासूनच मोर्चा निघण्याच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी सात पासूनच रस्ते बंद केले जातील.

यामध्ये जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, नळ स्टॉपपासून खंडूजीबाबा चौकापर्यंत कर्वे रस्ता सुरूवातीला बंद केले जातील. मोर्चा वाढत जाईल त्या प्रमाणात इतर रस्ते बंद केले जातील.

गर्दीचा आढावा घेऊन बाजीराव रस्ता व शिवाजी रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेटकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स्वारगेटवरून सिंहगड रस्तामाग्रे म्हात्रे पूल किंवा राजाराम पुलावरून नळ स्टॉपमाग्रे विधी महाविद्यालय रस्त्याने गणेश िखडमाग्रे शिवाजीनगरकडे जावे. सोलापूर रस्त्याने आलेली वाहने डेक्कनकडे जाण्यासाठी स्वारगेटवरून सावरकर चौक, दांडेकर पूल, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पुलावरून नळस्टॉपवर जाऊन इच्छित ठिकाणी जावे. नगर रस्त्यावरून स्वारगेटकडे येण्यासाठी खराडी बायपासने मगरपट्टामाग्रे सोलापूर रस्त्याने यावे.

वाहतुकीसाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते

  • बाजीराव रस्ता – पूरम चौक ते गाडगीळ पुतळा
  • जंगली महाराज रस्ता – स. गो. बर्वे चौकापासून डेक्कनपर्यंत.(कोथरूड वारजे परिसरात जाणाऱ्यांनी शिमला ऑफिस, गणेश िखडमाग्रे जावे.)
  • फग्र्युसन रस्ता- खंडोजीबाबा चौकापासून चापेकर चौकापर्यंत.(वाहन चालकांनी विधी महाविद्यालय रस्त्याचा वापर करावा.)
  • कर्वे रस्ता – नळा स्टॉप चौकातून डेक्कनपर्यंत. (शिवाजीनगरकडे जाण्यासाठी विधी महाविद्यालय रस्तामार्गे माग्रे गणेशिखड येथून जावे.)
  • नेहरू रस्ता – चिमणराव ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौकापासून पुणे स्टेशनपर्यंत.

लष्कर भागातील १८ रस्ते बंद

ससून ते पुणे स्टेशन रस्ता, बोल्हाई चौक ते साधू वासवानी पुतळा, बोल्हाई चौक ते आंबेडकर रस्ता (मोलेदिना रस्ता), मुख्य पोस्ट ऑफिस ते बोल्हाई चौक, पॉवर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक, किराड चौक ते एसबीआय चौक , नेहरू हॉल चौक ते जहांगीर चौक (साधू वासवानी रस्ता), दोराबाजी मॉल चौक ते मंगलदास चौक, एसबीआय हाऊस ते ब्लू नाईल (तारापोर रस्ता), सदर्न कमांड सिग्नल ते साधू वासवानी चौक,  सर्कीट हाऊस चौक ते अलंकार चौक (जनरल वैद्य रस्ता), क्वार्टर गेट चौक ते संत कबीर चौक (लक्ष्मी रस्ता), क्वार्टर गेट चौक ते कादर भाई चौक, नेहरू मेमोरिअल हॉल चौक ते जे. जे. गार्डन, आरटीओ चौक ते बोल्हाई चौक, संचेती हॉस्पीटल चौक ते शाहिर अमर चौक, क्वाटर गेट ते शांताई हॉटेल चौक, अपोलो चित्रपटगृह ते पॉवर हाऊस चौक (मुदलीयार रस्ता).