पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२२साठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. सीईटी सेलकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे सीईटीच्या नोंदणीला आणि परीक्षेलाही उशीर झाला होता. त्यामुळे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर सीईटीची नोंदणी प्रक्रिया थोडी लवकर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी जास्तीचा वेळ उपलब्ध होऊ शकेल. तसेच परीक्षाही लवकर झाल्यास कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर येऊ शकेल.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!