पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या कात्रज येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मुंबईत दोन मोर्चे काढले जात असून लिंगायत समाजाचा आणि लव्ह जिहाद विरोधात मोर्चा निघत आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोर्चाचा सिग्नल हा सरकार विरोधातील असतात. त्यामुळे हे असंवेदनशील ईडी सरकार आहे. सरकारमधील कोणी ऐकून घेत नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी लिंगायत समाजाचे प्रश्न संसदेत वेळोवेळी मांडत आली आहे. या समाजाचे प्रश्न समजून घेणं आणि मार्ग काढला पाहिजे. ही कोणत्याही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. तसेच लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे. त्याचा अर्थ मला माहिती नाही. पण मला त्याचा अर्थ कोणी समजून सांगितला तर मी नक्की त्यावर मत मांडेन. तसेच मला ‘लव्ह’चा अर्थ कळतो. ‘जिहाद’चा अर्थ कळतो. त्यामुळे लव्ह जिहाद काय आहे, याबाबत मला माहिती नाही. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

हेही वाचा >>> नागपुरात ठाकरे गटावर कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की?; भाडे, वीज देयक भरायलाही पैसे नाहीत

ज्यांनी पक्ष काढला त्यांनाच चिन्ह मिळालं पाहिजे

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाचा वाद सुरू आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आहे. त्यावेळीच स्वतः त्यांनी उत्तराधिकारी निवडला होता. तसेच चिन्ह देखील बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांचं ते चिन्ह दुसर्‍या कोणाला मिळणे योग्य होणार नाही. ज्यांनी उत्तराधिकारी निवडला, ज्यांनी पक्ष काढला त्यांनाच चिन्ह मिळाल पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. महाविकास आघाडी फोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर शिवसेनेसोबत आले आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, मला याबाबत काही माहिती नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा >>> कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात

२४ तास सुडाचं राजकारण सुरूच

राज्यात पदवीधर निवडणुक होत आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजे. चुरशीची निवडणुक होत असून ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी एका प्राचार्याला मारहाण केली. या सर्व घटना दुर्देवी आहेत. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये न बसणारी कामं करीत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भाषण ऐकत नाही. मोदी नेहमी म्हणतात की, प्रधान सेवक आहे. तसेच यांचं २४ तास सुडाचं राजकारण सुरूच आहे. अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली.

हेही वाचा >>> कसब्यात उमेदवारीवरून भाजपमध्येच चुरस

‘त्या’ विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे

तुकाराम महाराजांबद्दल बागेशेर महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मला आज पुन्हा एकदा अरुण जेटली यांची आठवण येते. अशा प्रकारची विधान दाखवणं बंद करा. त्यानंतर हे बोलणं बंद करतील. त्यामुळे त्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. हे चुकीचे असून मीदेखील आध्यात्मिकडे वळले आहे. घरात वाईट आहे म्हणून आध्यात्म करते असं नाही.

त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही

पहाटेच्या शपथ विधीवरून अनेक माहिती समोर येत आहे. त्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जयंतराव देखील यावर खूप बोलले आहेत. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. देशासमोर महागाई, बेरोजगारी सारखे अतिशय गंभीर प्रश्न समोर आहेत. आता केंद्रीय बजेट सादर केलं जाणार आहे. त्यातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. तसेच नारायण राणे यांनी पुण्यात विधान केलं होतं की, जून महिन्यात मंदी येणार आहे. ज्यावेळी केंद्रीय मंत्री अशी भूमिका मांडतात त्यावेळी सर्व मोठ्या आव्हानांवर चर्चा झाली पाहिजे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March against love jihad i know the meaning of love and jihad supriya sule statement svk 88 ysh
First published on: 29-01-2023 at 12:30 IST