पुणे : परराज्यातील मटारचा हंगाम संपल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. परराज्यातील मटारचा हंगाम संपल्यानंतर अहिल्यानगरमधील पारनेर परिसरातून मटारची आवक सुरू झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, ३ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ६०० ते ७०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, घेवडा२ ते ३ टेम्पाे, पावटा २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा १०० ते १२५ टेम्पो, तसेच पारनेरहून ८ ते १० टेम्पो मटार अशी आवक झाली. तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४५ टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांचे दर स्थिर
मार्केट यार्डातील तरकारी विभागात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक चांगली झाली. बहुतांश पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – ८०० ते १२००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ४०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ५०० ते ८००, चुका- ८०० ते १०००, चवळई – ५०० ते ७००, पालक -८०० ते १५००
संत्र्याच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात संत्र्याच्या दरात वाढ झाली. माेसंबी, लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, अननस, चिकू, पेरु, डाळिंब या फळांचे दर स्थिर आहेत. मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २ ते ३ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे ८०० ते १००० गोणी, कलिंगड ८० ते ९० टन, खरबूज ३० ते ३५ टन, चिकू दीड हजार गोणी, पेरू १०० ते १२५ प्लास्टिक जाळी, (क्रेट्स), अननस ६ ट्रक अशी आवक झाली.
