पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली आहे. माधुरी किरण फडतरे अस मयत महिलेचे नाव आहे. माहेरहून पैसे, मोटार घेऊन ये म्हणून पती किरण फडतरे याने मानसिक आणि शाररिक त्रास पत्नी माधुरीला दिला होता, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार किरण रामभाऊ फडतरे वय वर्ष ३३ रा. ड्रायव्हर वसाहत पुनावळे आणि माधुरी किरण फडतरे यांचा २०१२ मध्ये धूमधडाक्यात विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन वर्ष ती सुखाने नांदत होती. परंतु दोन वर्षानंतर अचानक माधुरी हिचा पती किरण फडतरे हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार दारू पिऊन मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा. शिवीगाळ करायचा, तू माहेर वरून पैसे घेऊन ये मला जमीन घ्यायची आहे तसेच मोटार घेऊन ये असा दम देखील द्यायचा. तब्बल अडीच ते तीन वर्ष हा त्रास माधुरी हिने सहन करत होती.

२४ फेब्रुवारी रोजी तिचा  संयमाचा बांध सुटला आणि सकाळी पावणे सहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने तिने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. हा सर्व प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना उघड झाली. या घटनेनंतर माधुरीचे वडील अनिल बोलगड रा. संग्राम नगर अकलूज, यांनी काल वाकड पोलीस स्थानकात माधुरीच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी किरण फडतरे याला वाकड पोलिसांनी पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कारणावरून अटक केली आहे. आज किरण फडतरे याला न्यायालयात हजर केल असून त्याला दोन दिवसाची न्यायालयीन पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे या करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman commits suicide pimpri chinchwad
First published on: 16-03-2017 at 17:37 IST