पिंपरी-चिंचवड भागातील पूर्णांनगर येथे एका ३८ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूजा प्रकाश पाटील अस आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात कोणी नसताना तिने टोकाचे पाऊल उचलले. दुपारी एकच्या सुमारास ही घटना समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या पूर्णानगरमध्ये विवाहित महिलेने आत्महत्या केली. पूजा प्रकाश पाटील (वय ३८) असे या महिलेचे नाव आहे. प्रकाश आणि पूजा यांना दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुले शाळेत गेल्यानंतर पूजाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दोन्ही मुले दुपारी एकच्या सुमारास घरी आली. त्यांनी बराचवेळ दरवाजा वाजवून देखील पूजाने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या शिक्षिकेने पूजा यांच्या मोबाईलवर संपर्क केला. मोबाईलवर देखील प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी अखेर पोलिसांना बोलावले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

पूजाचे पती प्रकाश पाटील हे दिल्ली येथे कामानिमित्त गेले आहेत. ते नेहमीच अशा प्रकारे बाहेर गावी असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्तेच कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.