नाना पेठेतील राजेवाडी भागात वैमनस्यातून तरुणाचा खून करणारा गुंड सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर यांच्यासह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत शहरातील आठ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

हेही वाचा – पुणे : पैसे मागितल्याने गुंडांचा पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला

सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय २८), राजन अरुण काउंटर (वय २३), तेजस अशोक जावळे (वय ३२), आतिष अनिल फाळके (वय २७, सर्व रा. नाना पेठ, राजेवाडी), आदित्य राजू केंजळे (वय १८, रा. धायरी, सिंहगड रस्ता) अशी कारवाई केलेल्या गुंडाची नावे आहेत. या प्रकरणात एका महिला आरोपीविरुद्ध पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. मट्या कुचेकर याने राजेवाडी भागात टोळी तयार केली होती. मटेकर आणि साथीदारांच्या विराेधात जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कुचेकर याने साथीदारांशी संगमनत करून वैमनस्यातून राजेवाडी भागातील एका तरुणाचा खून केला होता.

हेही वाचा – पुणे : अबोला धरल्याने प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ, तरुणाला पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

कुचेकर याच्यासह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तयार केला हाेता. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल आणि अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली.