नामांकित कंपन्यांकडून मोठी मागणी

पुणे : औषधी वनस्पतींच्या उद्योगातून लाखोंची उलाढाल करण्याची कामगिरी सुनील पवार या केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या आदिवासी तरुणाने के ली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. दिगंबर मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडेतीनशे प्रकारच्या औषधी वनस्पतींची विक्री करण्याच्या सुनीलच्या उद्योगातून अनेक कातकरी बांधवांना उत्पन्नाचे साधन मिळाले असून, नामांकित कं पन्या सुनीलकडून औषधी वनस्पती खरेदी करत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खरीड नावातील सुनील पवार हा कातकरी समाजातील तरुण गेली दोन वर्षे औषधी वनस्पतींचा उद्योग करत आहे. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गुळवेलीसह विविध औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचा फायदा त्याला झाला आहे. ‘२०१८मध्ये आदिवासी एकात्मिक संस्था सुरू करून हवनासाठीच्या समिधा, जंगलातील औषधी वनस्पतींची विक्री सुरू के ली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र काही लोकांकडून गुळवेलीची मागणी येऊ लागली. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातील डॉ. दिगंबर मोकाट यांच्याकडून नाशिकमधील मार्गदर्शन सत्रामध्ये औषधी वनस्पतींविषयी माहिती मिळाली. औषधी वनस्पतींची लागवड, प्रक्रिया, विक्रीबाबतचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर करोनाची टाळेबंदी सुरू झाल्यावर योगायोगाने करोना काळात गुळवेल, अश्वगंधा, शतावरी अशा औषधी वनस्पतींना मागणी वाढली. अलीकडेच नामांकित औषध कं पन्यांकडून दीड कोटींच्या औषधी वनस्पतींची मागणी आली आहे,’ असे सुनीलने सांगितले.

expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…

ट्रायसेड आणि आदिवासी शबरी विकास महामंडळाकडून या कामासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच संस्थेला चाळीस वनधन केंद्र मंजूर झाली आहेत. त्यापैकी सध्या शहापूर परिसरातील सहा केंद्रांवर मिळून १ हजार ८०० कातकरी बांधव काम करत आहेत. आता औषधी वनस्पतींची लागवडही करण्यात येणार आहे. या उद्योगातून माझ्यासह कातकरी बांधवांना रोजगार मिळाल्याचे समाधान आहे, अशी भावनाही सुनीलने व्यक्त के ली.

 

तरुणांना व्यवसायाची संधी

आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या अनेक कं पन्या देशात आहेत. त्यांना उत्पादनांसाठी औषधी वनस्पतींची गरज असते. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठय़ा संधी आहेत. तरुणांनी औषधी वनस्पतींच्या उद्योगाचा विचार के ल्यास त्यांना नक्कीच चांगला रोजगार मिळू शके ल, असेही सुनीलने सांगितले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राद्वारे सुनील पवार या तरुणाला औषधी वनस्पतींबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्याला गुळवेलीच्या लागवडीसाठी दहा हजार रोपे दिली आहेत. औषधी वनस्पतींची नर्सरीही करण्यात येणार आहे. सुनील पवारसारखा कातकरी तरुण उद्योजक म्हणून उभा राहिल्याचा आनंद आहे. आदिवासी बांधवांना स्वयंपूर्ण करण्यासाठी वनजमिनींवर औषधी वनस्पतींची लागवड करण्यास वनविभागाने प्रोत्साहन द्यावे.   – डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख संशोधक, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र