आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या युतीच्या निर्णयाबद्दलची शिवसेना भाजपमधील निष्फळ ठरली आहे. युतीबद्दलचा कोणताही निर्णय न झाल्याने येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये बैठक घेण्यात होणार आहे.

‘युती संदर्भातील बैठकीत दोन्ही पक्षांकडून एकमेकांना युतीचा तपशील देण्यात आला. युती करण्याचा अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिला असला तरी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीत अनेक प्रश्नावर साधकबाधक चर्चा देखील करण्यात आली. दोन्ही पक्षांना पटू शकेल, अशा सन्मानजनक युतीस आम्ही तयार आहोत. आगामी २ ते ३ दिवसात होणाऱ्या बैठकीत युतीबद्दलच्या निर्णयाची शक्यता आहे,’ असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

‘युतीच्या निर्णयाबद्दलच्या अडचणी संदर्भात दोन्ही पक्षाची सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपासंदर्भात अडचण दूर करण्यासाठी दोन दिवसात पुन्हा बैठक होणार आहे,’ अशी माहिती शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी दिली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढ़ण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात होणाया आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेमध्ये युती होते का, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होते की नाही, की हे चारही विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकला चलो रे ची भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.