पुणे रेल्वे स्थानकांतील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सदस्यांनी बैठकीत केला.

हेही वाचा >>>पुणे: अनुसूचित जातीच्या उमेदवारांना नवउद्यमीसाठी प्रशिक्षण

Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
ajit pawar
चावडी: अजितदादा आणि ईडी !
Steel Benches on Dombivli Railway Station with courtesy of Srikant Shinde
डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

रेल्वेचे अधिकारी अजोय कुमार, मंगेश पोळके, पुणे रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी.एस. रघुवंशी, लोहमार्ग निरीक्षक दीपाली मोरे यांच्यासह समितीचे सदस्य आदिनाथ शिंदे, संतोष राजगुरू, आनंद सप्तर्षी, गणेश यादव आदी बैठकीला उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. पाच दिवसांपूर्वीच स्थानकाच्या आवारातून एका मुलाच्या अपहरणाची घटना घडली होती. हे काही विषय बैठकीच्या चर्चेत घेऊन सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानकाच्या सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.

हेही वाचा >>>पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान; पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पुतळा जाळून निषेध

बैठकीत स्थानकाच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अपहरण झालेल्या मुलाचा तातडीने शोध घ्यावा. अशा प्रकारच्या घटना स्थानकाच्या आवारात होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अत्याधुनिक दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, स्थानकावरील बॅग तपासणीचे यंत्र पुन्हा कार्यरत करण्यात यावे, रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी असलेले अतिरिक्त प्रवेशद्वार बंद करावेत, अशा सूचना या वेळी समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या.