पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाने महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना महायुतीकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने आरपीआय (आठवले) पक्षाला शहरातील एक जागा तरी सोडावी, अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली होती. आत्तापर्यंत भाजपचा मित्र पक्ष म्हणून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यासोबत राहिलेल्या आरपीआयला भाजपने सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील एकही जागा महायुतीने आरपीआयच्या उमेदवाराला दिली नाही. याच्या निषेधार्थ आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा घेतली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पदाधिकाऱ्यांना ही शपथ दिली.

sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – मतदारयादीचा भूतकाळातही ‘गोंधळ’

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी आय्युब शेख, आरपीआयच्या पुणे महापालिकेच्या माजी गटनेत्या फरजाना शेख, मौलाना कारी मोबशीर अहमद, हनुमंत गायकवाड, तानाजी गायकवाड, ईश्वर ओव्हाळ, आदीसह आरपीआयचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे २५० पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

हेही वाचा – पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?

महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला राज्यात एकही जागा दिली नाही. याची खदखद सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या अनुयायांमध्ये आहे. राज्यातील आंबेडकरी विचारांच्या अनुयायांमध्ये देखील याबाबत तीव्र भावना आहेत. शहरातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात आहे. त्याचे पडसाद निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळतील, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले. आय्युब शेख म्हणाले, निवडणूक जवळ आली की मतदानासाठी आरपीआय पक्षाचा, दलित आणि मुस्लिमांचा वापर केला जातो. मतदान झाल्यानंतर मात्र या सर्वसामान्य घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जातीयवादी शक्तींना कोणत्याही स्थितीत सत्तेत बसू देणार नसल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Story img Loader