लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोळसे गल्लीतील एका दुकानात कारवाई करुन त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे ७७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

Dombivli crime news
डोंबिवली, कल्याणमध्ये १२ लाखाच्या अंमली पदार्थांसह १९ जणांना अटक, अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Frequent attacks on teams preventing illegal sand mining Threat to kill female Talathi
वाळू माफियावर महसूल प्रशासनाचा वचक नाही? अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकांवर वारंवार हल्ले
meghwadi police arrested accused with two pistols live cartridges and 10 lakh
दोन पिस्तुल आणि १० लाख रुपयांच्या रोख रकमेसह सराईत आरोपीला अटक
Four arrested with drugs worth Rs 200 crore drugs from America
२०० कोटींच्या अमली पदार्थांसह चौघांना अटक, अमेरिकेतून आले होते अमली पदार्थ
Suspect arrested for supplying injection drugs
नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक, वितरण साखळी उघडकीस
pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
mumbai a Suspect arrested Goregaon pistol mephedrone
पिस्तुल आणि मेफेड्रोनसह गोरेगाव येथून संशयीताला अटक

हुसेन नुर खान (वय २१) , फैजान अयाज शेख (वय २२, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फैजान याचे महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्लीत कुलूप विक्रीचे दुकान आहे. शहरात छुप्या पद्धतीने मेफेड्रोनची तस्करी आणि विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागातून पोलिसांनी २३ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

आणखी वाचा-सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

कोळसे गल्लीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचा साठा करुन ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विशाल दळवी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून फैजान आणि हुसेन यांना पकडले. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस कर्मचारी संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader