महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे (वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, दोन नातवंडे, दोन बंधू, बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा- पुणे: अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे युवा पुरस्काराचे मानकरी
डॉ. वाघमारे १९६५-६६ मध्ये अमेरिकेतील केंब्रिजमधील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून ते कार्यरत होते. तसेच नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. वाघमारे यांनी काम केले. त्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये १९६६ ते १९९७ या प्रदीर्घ काळात अध्यापन केले. तर सन २००० पासून ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते.
हेही वाचा- महाबँकेचे कर्मचारी संपावर, दोन हजारपेक्षा जास्त शाखा बंद; रोखीचे, धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले
डॉ. वाघमारे यांनी ८० पेक्षा अधिक शोधनिबंध, अण्विक भौतिकशास्त्र, अण्विक विज्ञान, अण्विक विज्ञान आणि अभियांत्रिकी अशा विविध विषयांवर पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. डॉ. वाघमारे यांनी इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे अध्यक्ष आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. ‘आयुका’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाशी ते निगडित होते.