पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी वापरण्यात येणारे लाेखंडी बांधकाम साहित्य चोरणाऱ्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी गजाआड केले. मेट्रोचे बांधकाम साहित्य चोरी प्रकरणात आणखी काही चोरटे सामील असून त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दीपक पांडुरंग इदवे (वय २८, रा. पिंपरी, मोरवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत दिनेश प्रधान (वय २२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रधान हा मेट्रोमध्ये सुरक्षारक्षक आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. रिक्षातून इदवे आणि साथीदार आले. इदवे आणि साथीदारांनी बाणेर परिसरातून २०० किलो वजनाचे लोखंडी पाईप चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी प्रधानने सहकाऱ्यांच्या मदतीने इदवेला पकडले. त्याच्या बरोबर असलेली एक महिला आणि साथीदार पसार झाले. इदवेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सहायक पोलीस फौजदार राहीगुडे तपास करत आहेत.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी