पुणे : केंद्रीय आयोगामार्फत विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) आज, गुरुवारी (२८ मे) होणारी सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाअंतर्गत कार्यरत पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील २० टक्के सर्वसमावेशक तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्रीअभावी रिक्त असलेल्या सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
