scorecardresearch

‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तब्बल ४६७८ सदनिकांसाठी आयएलएमएस २.० या संगणक प्रणालीच्या माध्यमातून सोडत काढण्यात येणार आहे.

‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तब्बल ४६७८ सदनिकांसाठी आयएलएमएस २.० या संगणक प्रणालीच्या माध्यमातून सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा होती आणि त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाननी आदी प्रक्रिया पार पाडली जात होती. आता नवीन आयएलएमएस २.० प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करावी लागणार आहे.   पुणे म्हाडा विभागांतर्गत प्रथमच केवळ पुणे जिल्ह्यांतर्गत सोडतीमध्ये साडेचार हजारांहून अधिक सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील २८४०, सर्वसमावेशक योजनेंतर्गत (२० टक्के) १४३५ आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४०३ अशा एकूण ४६७८ सदनिकांचा समावेश आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या