scorecardresearch

MHT-CET 2022 आता ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार

जेईई, नीटमुळे एमएचटी-सीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय

(संग्रहीत छायाचित्र)

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन), वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) जून-जुलैमध्ये होत आहेत. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जूनमध्ये होणारी एमएचटी-सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. आता एमएचटी-सीईटी ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार असून, अन्य सीईटी ३ ते १९ जून या कालावधीत होणार आहेत.

जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी आल्याने महाराष्ट्राकडून घेण्यात येणारी एमएचटी- सीईटी परीक्षा लांबवणीवर पडली आहे. याबाबतचं ट्विट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. संबंधित परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, याबाबतचे संकेत देखील मंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिले होते. तसेच, परीक्षाबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं होतं.

खरंतर, एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान होणार होती. पण जेईई मेन २०२२ ही परीक्षा देखील जूनमध्येच सुरू होणार आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून एनईईटी ही परीक्षा होणार आहे. या दोन परीक्षामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे. एनईईटी परीक्षा पार पडल्यानंतर एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mht cet 2022 will now take place between 5th and 18th august pune print news msr

ताज्या बातम्या