वंचित बहुजन आघाडी भाजपाची 'बी' टीम? चंद्रकांत पाटील हसत म्हणाले...| minister chandrakant patil on prakash ambedkar bjp b team allegation | Loksatta

वंचित बहुजन आघाडी भाजपाची ‘बी’ टीम? चंद्रकांत पाटील हसत म्हणाले…

“काँग्रेसच्या कार्यकाळात १९ वेळा विधानसभा…”

Chandrakant Patil prakash ambedkar
चंद्रकांत पाटील प्रकाश आंबेडकर ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईडी, सीबीआय किंवा आयकर या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असं वाटत नाही. ते जे करत आहेत, त्यांच्या जागी मी असतो तरी तेच केलं असतं, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल आभार मानतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

कसबा पेठ पोटनिवडणुकीबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “२०१४ पासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तेव्हापासून आजअखेर देशातील कोणत्याही राज्यात विधानसभा बरखास्त करुन राष्ट्रपती राजवाट लावण्यात आली नाही. तर, काँग्रेसच्या कार्यकाळात १९ वेळा विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली होती. मोदींच्या कार्यकाळात असं करता आलं असतं. पण, कुठं लोकशाही कुठं हुकूमशाही,” असं म्हणत काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

हेही वाचा : वंचितसोबतच्या आघाडीबाबत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आम्ही त्याची चर्चा…”

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपाने पाठवलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे का? असं विचारलं असता हसत चंद्रकांत पाटील म्हणाले, “फार पूर्वी पाऊस नाही पडला, तर संघाचा हात आहे. अतिवृष्टी झाली तर संघाचा हात आहे. तसे, अलीकडे काही झालं तर भाजपाचा हात आहे, असं म्हटलं जातं.”

हेही वाचा : “राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो, पण …” शरद पवारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी खेळी असल्याचं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस अथवा अजित पवार भूमिका मांडत नाही, असं विचारलं असता चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, “काही प्रश्नांची उत्तर कधीच मिळत नसतात. देवेंद्र फडणवीस त्यावर पुस्तक लिहतील,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:30 IST
Next Story
उजनी धरण परिसरात स्थलांतरित पट्टकदंब हंसाचे आगमन