पुणे : ससून रुग्णालयातील महिला रोग निदान केंद्रातील इलेक्ट्रीक बोर्डला सोमवारी दुपारी आग लागली. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ससून रुग्णालयात कक्ष क्रमांक एकमध्ये महिला राेगनिदान केंद्र (वुमन डायग्नोस्टिक सेंटर) आहे. सोमवारी दुपारी कक्षातील इलेक्ट्रिक बोर्डाल आग लागली. आग लागल्याचे समजताच महिला रोग निदान कक्षात घबराट उडाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणाचा वापर करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती.

नॅक मूल्यांकन केले नाही म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय!