पुणे : वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाने पुणे-सातारा रस्त्यावरील एका लाॅजवर छापा टाकला. या कारवाईत एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेण्यात आले. तरुणीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन दलाल महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.
वर्षा शंकर शिरसाठी (वय ३५, रा. विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (वय ३५, रा. पेपर मिलसमोर, साने चौक, चिंचवड), जीवन प्रमोद इंगोले (वय ३३, सध्या रा. साई लाॅज, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये (पिटा) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील साई लाॅजमध्ये एका अल्पवयीन युवतीला आरोपी दलाल शिरसाठी, जेधे यांनी आणले होते. अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायास प्रवृ्त केले जात असल्याची महिती पोलिसांना मिळली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी लाॅजमधून एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, रेश्मा कंक, इंगळे, इम्रान नदाफ,भुजबळ यांनी ही कारवाई केली. यांनी ही कारवाई केली.
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पोलिसांनी हडपसर भागात मसाज पार्लरवर छापा टाकून व्यवस्थापकाला अटक केली. कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सौरभ शामराव इंगळे (वय २८, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील गाडीतळ परिसरात असलेल्या एका इमारतीत व्हाईट पर्ल स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजममा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरचा व्यवस्थापक इंगळे याने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मसाज पार्लरमधून तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
