scorecardresearch

पुणे: टीव्हीचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक

अत्याचार करताना पीडितेचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठ्या प्रमाणात ठेवला होता.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमधील म्हाळुंगे येथे १२ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पत्नी कामावर गेली असताना भाजी बनवण्यासाठी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलवून घरातील टीव्हीचा आवाज मोठ्याने करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला, अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे. योगेश साहेबराव चाटी (वय- ३१) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशची पत्नी कामावर गेल्यानंतर ओळखीच्या १२ वर्षीय मुलीला घरात कोणी नाही, भाजी बनवण्यासाठी ये अशी थाप मारून घरी बोलावले. दरम्यान, अल्पवयीन मुलगी ही विशिष्ट समाजाची असून अत्यंत गरीब घरातील आहे. योगेशने तिच्यावर बळजबरी करत अनैसर्गिक अत्याचार केले. गंभीर बाब म्हणजे अत्याचार करताना पीडितेचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठ्या प्रमाणात ठेवला होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे.  ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान, अत्याचार झाल्यानंतर पीडित मुलगी घरी गेली आणि घडला सर्व प्रकार तिने कुटुंबातील व्यक्तींना सांगितली. त्यानंतर, संबंधित आरोपी योगेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास अरविंद जाधव हे करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minor girl raped by neighbour is pune hrc 97 kjp

ताज्या बातम्या