scorecardresearch

संतापजनक: पुण्यात १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women protection shakti law maharashtra in marathi
( प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे स्टेशन ते माल धक्का दरम्यान येणार्‍या सार्वजनिक शौचालयामध्ये १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते मालधक्का चौक दरम्यान येणार्‍या एक सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या आतमधील छोट्याशा जागेत, पीडित १२ वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहण्यास आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचास गेल्यावर तिच्या मागे एक व्यक्ती गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

त्याच दरम्यान पीडित मुलीचा काका तिथे आल्यावर दरवाजा वाजविला. त्याच क्षणी आरोपी दरवाजा उघडून काकाला बाजूला ढकलून गेला आणि पीडित मुलीने काकाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आमच्याकडे तक्रार येताच आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी त्याच भागातील असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minor girl raped in public toilet pune svk 88 hrc

ताज्या बातम्या