जेजुरी वार्ताहर खंडोबा गडावर दर्शन घेऊन कडेपठारच्या डोंगरात दर्शनासाठी दुपारी एक वाजता निघालेल्या आजी (वय ६०) व नातीला( वय-१३) जवळच्या वाटेने देवाला जाऊ असे सांगून एका नराधमाने गोड बोलून दरीतील जानाई मंदिराजवळ नेले, हे ठिकाण खोल दरीत असल्याने त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न सुरु केला, मात्र या दोघींनी मोठा प्रतिकार केल्याने आरोपी पळून गेला,यावेळी मुलीने त्याला एक दगड फेकून मारल्याने त्याच्या कपाळातून रक्त आले, सोमवारी (दि २५ ) रात्री पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. नेमकी काय घडली घटना? शुक्रवारी (दि. २२) सप्टेंबर रोजी या दोघीजणी खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आल्या होत्या, दर्शन झाल्यावर त्या डोंगरातील वाटेने कडेपठारकडे निघाल्या, वाटेत त्यांना ४० ते ५० वयाचा एक जण भेटला, मी देवदर्शनासाठीच निघालो आहे. तुम्हाला जुन्या गडावर जाण्याचा जवळचा रस्ता दाखवतो असे म्हणत त्याने बरोबर येण्यास सांगितले, त्याचेवर विश्वास बसल्याने दोघीजणी त्याच्याबरोबर डोंगरातील एका खोल दरीत उतरल्या, तेथे असणाऱ्या जानाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले.हा परिसर निर्मनुष्य असल्याने संधी साधून त्याने या अल्पवयीन मुलीची छेडछाड सुरू केली, मुलगी ओरडू लागल्याने आजी प्रतिकार करण्यासाठी पुढे आली तेव्हा त्याने आजीला लाथा बुक्क्याने मारहाण करीत ढकलून दिले, अल्पवयीन मुलीशी तो गैरवर्तन करू लागला, यावेळी तिने प्रसंगवधान राखून एक दगड जोरात त्याला मारला दगड कपाळाला लागून रक्त आल्यानंतर तो पळाला. हा प्रकार घडल्यानंतर दोघीजणी घाबरलेल्या अवस्थेत कडेपठार मंदिराजवळ आल्या व त्यांनी घडलेला प्रकार तेथील तरुणांच्या कानावर घातला. जेजुरीत फिर्याद दाखल यानंतर त्यांनी जेजुरीतील खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेतले व गावाकडे निघून गेल्या. घरच्या परिवारातील लोकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी जेजुरीत येऊन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी आज जेजुरी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. जेजुरी पोलिसांनी भा.द.वि.कलम कलम ३७६ /३२३/ ५०४/ ५०६ यासह बाल लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बापूसाहेब सांडभोर अधिक तपास करीत आहेत. खंडोबा मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडल्याने जेजुरीत खळबळ उडाली आहे. आरोपी मध्यम वयाचा या प्रकरणातील नराधम हा ४० ते ५० अशा मध्यम वयाचा असून डोक्यावर टक्कल पडलेले आहे अंगात आकाशी रंगाचा फुल शर्ट काळी पॅन्ट घातलेला,हातात तंबाखूचा बटवा असे त्याचे वर्णन आहे पोलिसांनी त्याचे स्केच बनवण्याचे काम हाती घेतले आहे.