scorecardresearch

पुणे: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांचा उपचारांना मिळणारा प्रतिसादही समाधानकारक असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे अतिदक्षता विभाग उपचार तज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांनी दिली.

पुणे: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
आमदार जयकुमार गोरे(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांचा उपचारांना मिळणारा प्रतिसादही समाधानकारक असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे अतिदक्षता विभाग उपचार तज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांनी दिली. आमदार गोरे यांचा शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजता अपघात झाला. त्यानंतर साताऱ्यातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या ‘मिडी बस’ पीएमपी परत घेणार

रुग्णालयातील न्यूरो ट्रॉमा विभागामध्ये गोरे यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गोरे यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून त्यावर रुग्णालयातर्फे उपचार करण्यात येत आहेत.रविवारी दिवसभरात गोरे यांचा उपचारांना मिळत असलेला प्रतिसाद समाधानकारक असून लवकरच ते पूर्ण बरे होतील, अशी माहिती डॉ. कपिल झिरपे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 11:06 IST

संबंधित बातम्या