पिंपरी : जन्मदाती आईनंतर जास्त प्रेम देते, आपुलकीने जपते, जगायला शिकवते ती मावशी म्हणूनच भोसरी माझी आई; तर चऱ्होली माझी मावशी आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये चऱ्होलीकरांनी कायम साथ दिल्याची भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी महापौर नितीन काळजे हे देखील लांडगे यांच्यासोबत दिसले.

भोसरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी चऱ्होली गावचे ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

हेही वाचा – विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; एकाविरुद्ध गुन्हा, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर घबराट

माझ्या राजकीय संघर्षाच्या काळात चऱ्होलीकरांनी दिलेला आधार कदापि विसरु शकत नाही. विकासाच्या मुद्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या १० वर्षांत चऱ्होलीसह समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली. समाविष्ट गावांमध्ये दोन महापौरांसह विविध मानाची पदे दिली. भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चऱ्होलीतील भूमिपुत्र बांधकाम व्यावसायिक घडले. याचा अभिमान वाटतो. रस्ते, पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे चऱ्होलीचा चेहरामोहरा बदलला आहे. मतदारसंघातील नागरिकांना अभिमान वाटावा, असे काम करीत राहीन. माझे जीवाभावाचे सहकारी सोबत आहेत. ‘‘जब साथ हो मेरे दोस्त…तो संघर्षपथपर विजय निश्चित हैं..! ’’ याची अनुभूती येते आहे. अत्यंत सकारात्मक- मंगलमय वातावरणात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे’’, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा – पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद

माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, आम्ही महेश लांडगे यांच्यासोबत २०१४ साली गेलो. त्यावेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता गेलो होतो. महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपाची सत्ता आली. २०१७ मध्ये मला महापौरपदाची संधी मिळाली. मी नितिमत्ता जपणारा माणूस आहे. चऱ्होलीला, मला एव्हढे मोठे पद महेश लांडगे यांच्यामुळेच मिळाले. महापालिकेत चऱ्होली गावचा समावेश झाला. १७ वर्षे साधा डीपी रस्ता करता आला नाही. पूर्वीची परिस्थिती काय होती, हे चऱ्होलीकरांना माहिती आहे. २०१७ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून चऱ्होली गावाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. विकासाच्या बाबतीत चऱ्होलीचे नाव पंचक्रोशीत निघते. त्यामुळे २०१४ मध्ये ज्याप्रमाणे चऱ्होली निर्णायक ठरली, तसेच २०२४ मध्येसुद्धा चऱ्होलीकर निर्णायक भूमिका बजावतील. या परिसरातून महेश लांडगे यांना सर्वाधिक मतदान होईल, असा दावाही माजी महापौर काळजे यांनी केला आहे.