लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदारांनी केवळ नातेवाईक आणि भाच्यांना मोठे करण्याचे काम केले. महापालिकेतील कंत्राटे नातेवाइकांनाच दिल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
anti-corruption awareness phrases, Circular of Charity Commissioner, High Court,
भ्रष्टाचाराविरोधी जागरूकता करणाऱ्या वाक्यांच्या वापरास मनाई ? धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाकडून रद्द
Two arrested for attacking Chandrakant Tingre Pune print news
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली
ase filed against Uttam Jankar in Markadwadi case
उत्तम जानकर यांच्यावर मारकडवाडी प्रकरणी गुन्हा
The High Court has clarified that citizens do not have such a fundamental right to complain repeatedly on the same issue. Mumbai print news
एकाच मुद्यावर वारंवार तक्रारी करणे ही सरकारी, निमसरकारी अधिकाऱ्यांची छळवणूक; नागरिकांना असा मूलभूत अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Policeman threatened to lose job by claiming to know Chinchwad MLA
चिंचवडचे आमदार ओळखीचे असल्याचे सांगत पोलिसाला नोकरी घालविण्याची धमकी
Mumbai Municipal Corporation stopped project in Colaba
कुलाब्यातील प्रकल्पाला पालिकेची स्थगिती?

महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथील युवक मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, विशाल वाकडकर, इम्रान शेख या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?

चिंचवड मतदारसंघात काहींनी फक्त नातेवाईक आणि भाच्यांना मोठे केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे घाणेरडे राजकारण केले. मतदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. चिंचवडची निवडणूक आता सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे. चिंचवडकर यंदा कंत्राटदार पॅटर्न हद्दपार करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. २० वर्षं सत्ता असताना कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रत्येक निवडणुकीला पुन्हा तीच आश्वासने दिली जातात. मूलभूत समस्यांमुळे येथील नागरिक वैतागले आहेत. मुबलक पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही. गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. भाजप मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला.

आणखी वाचा-पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी सांगवी येथील भाजपशी संलग्न राहिलेले अपक्ष माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. हा भाजपला धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर मराठवाडा विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी स्वीकृत सदस्य शिवाजी पाडुळे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे यांनीही या वेळी प्रवेश केला.

Story img Loader