पुणे: हिंदू धर्मीयांनी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे;अजय शिंदे यांचा आमदार रवींद्र धंगेकराना टोला

पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत.त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण राज्य सरकार मार्फत हटविण्यात यावे.

mns Ajay Shinde
अजय शिंदे

पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत.त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण राज्य सरकार मार्फत हटविण्यात यावे.अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचा मुद्दा नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीकडून उपस्थित केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहे.त्यामुळे त्यांच्याकडून मंदिराच्या भूमिके बाबत काय अपेक्षा आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

त्या प्रश्नावर अजय शिंदे म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या ठिकाणी मंदिर नसून दर्गाच आहे.मी तुमच्या मशिदी बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल,असा प्रचार (आमदार रवींद्र धंगेकर) हे करीत होते.तसेच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर हिरवा गुलाल उधळण्यात आला.त्यामुळे कोणत्याही हिंदू धर्मीयांनी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून (आमदार रवींद्र धंगेकर)अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे असल्याच सांगत आमदार रवींद्र धंगेकर यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की,जर त्यांना मंदिराबाबत काही पुरावे पाहिजे असतील.तर मी त्यांना देऊ इच्छितो.त्याच बरोबर ते ज्या भागात राहतात त्याचा त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे.त्यानंतर त्यांच्या निश्चित लक्षात येईल की,तिथे मंदिराच होती.अशा शब्दात आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर अजय शिंदे यांनी निशाणा साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:39 IST
Next Story
पिंपरी : अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनाच मारहाण
Exit mobile version