महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात एक जाहीर सभा घेणार होते. त्याबाबत सभेच्या ठिकाणासाठी चाचपणी केली जात होती. राज ठाकरे स्वत: सभेच्या ठिकाणाबाबत घोषणा करणार होते. पण आज ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे सभा लांबणीवर पडली आहे. यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. दरम्यान ही सभा रद्द होणार असल्याबाबतही बोललं जात होतं.
याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडभरात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज ठाकरे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray rally in pune latest update by mns worker rmm