scorecardresearch

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन

२२ डिसेंबरला भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीच्या काळात मुक्ता टिळक यांनी ॲम्बुलन्समधून येऊन मतदान केले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन
राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन

कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा- परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार दिल्यास उच्च शिक्षणात दरी..; यूजीसीच्या मसुद्याबाबत शिक्षणतज्ज्ञांना शंका

मी मागील आठवड्यात पुण्यातच होतो. पण बुधवारी आणि शनिवारी जायच नसते. म्हणून मी येऊ शकलो नाही. मी ताईंना काही महिन्यांपूर्वी येथेच भेटलो असल्याची आठवण राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली. तर मध्यंतरी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानला स्वतःहून गेल्या होत्या. मला मतदानाला जायच असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मुक्ता टिळक यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच शैलेश टिळक आणि कुटुंबीयांना मुंबईला आल्यावर घरी या आपण भेटूयात, असं निमंत्रण देखील यावेळी राज ठाकरे यांनी टिळक कुटुंबीयांना दिली. कसबा विधानसभा मतदार संघाचे भाजप पदाधिकारी तसेच मनसेचे स्थानिक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या