भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच दुर्धर आजाराने निधन झालं. जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर सर्व पक्षीय नेते जगताप यांच्या चंद्ररंग निवस्थानी येऊन कुटुंबीयांची भेट घेत आहेत. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

हेही वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि राज ठाकरे यांचे चांगले राजकीय संबंध होते. २०१४ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप हे शेकाप आणि मनसेचा पाठिंबा घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा, राज ठाकरे यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील मैदानात लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. मात्र, त्या खासदारकीच्या निवडणूकीत लक्ष्मण जगताप यांचा पराभव झाला होता. आज राज ठाकरे हे जगताप यांच्या निवासस्थानी दाखल झाले. लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहून त्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.