पिंपरी चिंचवड शहरात निगडी ते दापोडी या १२ किलोमीटर अंतराच्या प्रमुख महामार्गासह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (७ ऑक्टोबर) महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा >>>डुलकी लागल्याच्या आरोपांवर दिपक केसरकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले “मी झोपलो नव्हतो, तर….”

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

शहराध्यक्ष सचिन चिखले, महापालिका सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राजू सावळे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी गलथान प्रशासकीय कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा >>>राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद

मनसेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना या वेळी निवेदन देण्यात आले. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. सणासुदीमुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे. एखादी वाईट घटना घडण्यापूर्वीच सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.