उचलबांगडीनंतर वसंत मोरेंना राष्ट्रवादीची खुली ‘ऑफर’, मनसे सोडणार? मोरे म्हणतात….!

कारवाईनंतर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? प्रश्न विचारताच म्हणाले, “माझ्या डोक्यात…!”

mns vasant more raj thackeray ncp
वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची आज पक्षानं तडकाफडकी पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. त्यांच्याजागी मनसेचे नेते साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यानंतर पुण्यातील मनसे संघटनेमध्ये अंतर्गत वाद असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वसंत मोरे यांची पक्षानं पदावरून उचलबांगडी केल्यानंतर आता त्यांना इतर पक्षांकडून ऑफर्स येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यासंदर्भात वसंत मोरे यांनी देखील दुजोरा देताना त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रशांत जगताप यांची ऑफर!

वसंत मोरे यांना पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. “वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागतच करू”, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. यासंदर्भात बोलताना नुकत्याच मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील वसंत मोरेंवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणं वसंत मोरेंना भोवलं? मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी!

“वसंत मोरेंसारख्या कार्यक्षम लोकप्रतिनिधीचं मी कालही स्वागत केलंय. आजही आमचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही वसंत मोरेंना स्वागत असल्याचं सांगिलं आहे. निर्णय घ्यावा लागतो. लोकप्रतिनिधींकडे निर्णयक्षमता असायला लागते. वसंत मोरेंनी कालच निर्णय घेतला असता, तर आजची दुर्दैवी वेळ आली नसती”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

“वसंतभाऊ, तुमची राजकीय हत्या की आत्महत्या?”

“ही मनसेची अंतर्गत खेळी आहे. वसंत मोरे लोकप्रतिनिधी आहेत. संघटनेचं देखील चांगलं काम करतात. मनसेच्या याच खेळ्यांना वैतागून मी मनसेचा राजीनामा दिला होता. तेव्हा वसंत मोरे म्हणाले होते की ताईंची राजकीय आत्महत्या आहे. पण वसंतभाऊ, आज तुमची राजकीय हत्या आहे की आत्महत्या हे सगळा महाराष्ट्र बघतोय. ही दुर्दैवी गोष्ट आहे”, असं देखील रुपाली पाटील यांनी नमूद केलं.

पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”

वसंत मोरे यांचं स्पष्टीकरण!

दरम्यान, राष्ट्रवादीच्या ऑफरनंतर वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देणार का? यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात खुद्द वसंत मोरे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून खूप लोकांनी संपर्क केला आहे. पण मी प्रत्येकाला हेच उत्तर दिलं आहे की माझ्या डोक्यात मनसे आणि राज ठाकरेंना सोडण्याचा विचार नाही. जेव्हा असेल, तेव्हा मी उघडपणे सांगेन”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वसंत मोरेंच्या उचलबांगडीनंतर नव्या पुणे शहराध्यक्षांना राज ठाकरेंनी दिली तंबी; पत्रात म्हणाले, “कोणतीही कुचराई…!”

भोंग्याबाबतची भूमिका बदलणार?

भोंग्याबाबत राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली. त्यानंतर आता त्यांची भूमिका कायम राहणार की बदलणार? यावर देखील वसंत मोरे यांनी खुलासा केला आहे.

ठभोंग्यांबाबतची माझी भूमिका मी कशी बदलू शकतो? लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका सलोख्याचीच राहणार. माझा भाग शांत राहावा. मनसेचा कार्यकर्ता म्हणूनही मी यावर ठाम आहे. पक्षासाठी हे पद मोठं असेल, माझ्यासाठी नाही. गेल्या १५ महिन्यांत पक्षाची परिस्थिती सगळ्यांनीच पाहिली आहे”, असं मोरे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-04-2022 at 15:36 IST
Next Story
पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”
Exit mobile version