scorecardresearch

पुणे: “पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे उत्खनन करावे, अन्यथा…”, मनसेचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा

पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत.पण त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे.या दोन्ही मंदिराचे उत्खनन केले जावे.त्यातून सत्य परिस्थिती निश्चित समोर येईल.

puneshwar mitra mandal

पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत.पण त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे.या दोन्ही मंदिराचे उत्खनन केले जावे.त्यातून सत्य परिस्थिती निश्चित समोर येईल. हे सर्व महिन्याभरात राज्य सरकारने करावे.अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका.असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे फडणवीस सरकारला त्यांनी दिला.

यावेळी अजय शिंदे म्हणाले की,पुणे शहराची ओळख असलेल्या पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण आहे.ते अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासुन लढा देत असून ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.पण अनेक दाखले आणि कागद पत्रामधून मंदिर परिसरात अतिक्रमण असल्याचे स्पष्ट होत आहे.पण आजपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

आम्ही मागील अडीच कालावधी असलेल्या राज्य सरकारकडे देखील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती.पण त्या सरकारने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.त्या उलट आम्ही केलेल्या विधानाबाबत आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले.त्यातून त्या सरकारची भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की,मागील आठ महिन्यापूर्वी शिंदे आणि फडणवीस यांच सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले आहे.या सरकारकडून अनेक अपेक्षा आहे.तसेच गुढीपाडवा सणाच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील दर्ग्या बाबत मांडलेल्या भूमिकेच्यानंतर पुढील काही तासात तो दर्गा हटविला गेला आहे.त्या कारवाईच आम्ही स्वागत करीत असून आता पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे उत्खनन करण्यात यावे.तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमण देखील हटविण्यात यावे.अशी आमची मागणी आहे.याबाबत राज्य सरकारने महिन्याभरात कार्यवाही न केल्यास आम्हा मनसैनिकांना उत्खनन करण्याची वेळ आणू नका असा इशारा राज्य सरकारला देखील त्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:57 IST

संबंधित बातम्या