मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या ध्वनिवर्धकावर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांना खडकी पोलिसांनी अटक केली.

सुमित सुभाष मिश्रा (वय २०), रसल एल्वीस जॉर्ज (वय २७), ऋषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय २३), सिद्धार्थ महादेव लोहान (वय २४, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ध्वनिवर्धकावर गाणी लावून आरोपी नृत्य करत होते. कोणती गाणी ध्वनिवर्धकावर वाजवायची, या कारणावरून आरोपींमध्ये वाद सुरू होता.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही वाचा >>> पुणे : माझी लाल दिव्याची गाडी… स्पर्धा परीक्षार्थींची कहाणी रॅप गाण्यातून; स्पर्धा परीक्षार्थींनी मिळून केली चित्रपटाची निर्मिती

ध्वनिवर्धकाचा आवाज ऐकून गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, सहकारी पोलीस कर्मचारी जाधव तेथे गेले. त्यांनी ध्वनिवर्धक बंद करा, असे सांगून कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपींनी अरेरावी सुरू केली. आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलीस आम्हाला काही करू शकणार नाही, असे सांगून आरोपींंनी उपनिरीक्षक बेंदगुडे आणि जाधव यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबु्क्की केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम तपास करत आहेत.