खासगी सावकारीसह कौटुंबिक हिंसाचार तसेच तत्सम गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या औंधमधील नाना गायकवाड याच्यावर शुक्रवारी येरवडा कारागृहाच्या आवारात तीक्ष्ण शस्त्राने हल्ला झाला. गायकवाड याच्या उपद्रवी कारवायांमुळे त्याला येरवडा कारागृहातून हलवण्याबाबत कारागृह प्रशासनाने नुकताच न्यायालयाला अर्ज सादर केला होता. येरवडा कारागृहात अलीकडच्या काळात तीन मारामाऱ्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
हेही वाचा >>> प्रभात रस्त्यावर विचित्र अपघात; तीन जखमी; पाच वाहनांचे नुकसान
गायकवाड आणि कारागृहातील कैद्यांमध्ये दोन महिन्यांपूर्वी हाणामारी झाली. त्यातूनच शुक्रवारी दुपारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. कारागृहात स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी गायकवाड यानेच हा बनाव रचला आहे ? किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे. कैद्यांनी कारागृहातील पत्र्याच्या साहाय्याने त्याच्यावर तीक्ष्ण वार केले असल्याचे वैयकिय तपासणीत आढळले आहे. कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत कारागृह प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आ