mocca accused aana gaikwad attack in jail pune print news vvk 10 zws 70 | Loksatta

पुणे : मोक्कातील आरोपी नाना गायकवाडवर कारागृहात हल्ला

येरवडा कारागृहात अलीकडच्या काळात तीन मारामाऱ्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

jail
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

खासगी सावकारीसह कौटुंबिक हिंसाचार तसेच तत्सम गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या औंधमधील नाना गायकवाड याच्यावर शुक्रवारी येरवडा कारागृहाच्या आवारात तीक्ष्ण शस्त्राने हल्ला झाला. गायकवाड याच्या उपद्रवी कारवायांमुळे त्याला येरवडा कारागृहातून हलवण्याबाबत कारागृह प्रशासनाने नुकताच न्यायालयाला अर्ज सादर केला होता. येरवडा कारागृहात अलीकडच्या काळात तीन मारामाऱ्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा >>> प्रभात रस्त्यावर विचित्र अपघात; तीन जखमी; पाच वाहनांचे नुकसान

गायकवाड आणि कारागृहातील कैद्यांमध्ये दोन महिन्यांपूर्वी हाणामारी झाली. त्यातूनच शुक्रवारी दुपारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. कारागृहात स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी गायकवाड यानेच हा बनाव रचला आहे ? किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे. कैद्यांनी कारागृहातील पत्र्याच्या साहाय्याने त्याच्यावर तीक्ष्ण वार केले असल्याचे वैयकिय तपासणीत आढळले आहे. कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत कारागृह प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 21:51 IST
Next Story
पुणे : ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुलेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात; कसबा पोटनिवडणुकीसाठी घेतला उमेदवारी अर्ज