scorecardresearch

पुणे:कोथरूडमध्ये दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

कोथरूड, भूगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

कोथरूड, भूगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

या प्रकरणी अविनाश राजेंद्र कांबळे, रवी ज्ञानेश्वर बोत्रे, किरण ज्ञानेश्वर बोत्रे (तिघे रा. श्रावणधारा वसाहत, गणंजय सोसायटी, कोथरूड), सूरज उर्फ सोन्या राम कुडले (वय ३१, रा. शेडगे आळी, भूगाव) यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. कांबळे आणि साथीदारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तयार करून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कांबळे टोळी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mocca operation against terror gang in kothrud pune print news amy

ताज्या बातम्या