मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले.  केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने मोदी फेस्ट-मेकिंग ऑफ डेव्हलपमेंट इंडिया या प्रदर्शनाच्या प्रचारार्थ तयार केलेल्या रथाचे दानवे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. त्शहराध्यक्ष योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस उज्ज्वल केसकर, नगरसेवक गोपाळ चिंतल, राजेश येनपूरे, योगेश समेळ, मंगला मंत्री यांच्यासह पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.  माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देशातील तीनशे शहरांमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बाबूराव सणस मैदानात १० ते १२ जून या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government scheme raosaheb danve
First published on: 02-06-2017 at 03:35 IST