पुणे : राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न | Modi government voice Rahul Gandhi opposition Congress alleges agitation District Collector office pune print news amy 95 | Loksatta

पुणे : राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रातील मोदी सरकार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,

पुणे : राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन( प्रतिनिधिक छायाचित्र )

काँग्रेसचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रातील मोदी सरकार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ मैं भी राहुल गांधी मोहीम हाती घेत केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राज्याचे सहकार राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, राजेश राठोड, लहू कानडे, जयंत आसगांवकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, महिला शहराध्यक्षा पूजा आनंद, माजी नगरसेवक आबा बागुल, लता राजगुरू, अविनाश बागवे, चंदू कदम, रफिक शेख उपस्थित होते.
सरकारी यंत्रणांच्या गैरवापरामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.

देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरु झाली आहे. या प्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. सूडाचे राजकारण करून विरोधकांना त्रास दिला जात आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांन रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला पाहिजे, असे डाॅ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.प्रणिती शिंदे म्हणाल्या की,सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पाडल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई; चतु:शृंगी भागात दगडफेक, वाहन तोडफोडीचे गुन्हे

संबंधित बातम्या

पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी
बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान
ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, एकाही भारतीयाचा समावेश नाही
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”
“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”