येरवडा येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलेश उर्फ पिन्या संजय साळवे ( वय २१.रा. येरवडा), ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने (वय २१, रा. यशवंत नगर, येरवडा), निखिल उर्फ पप्प्या संदीप साळवे (वय २०) अशी ‘मोका’ नुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश साळवे व त्याचे साथीदार हे पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. साळवे व त्याच्या साथीदारांनी येरवडा परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी संघटितपणे व वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरातील चोरी, मालमत्ते विषयक, जाळपोळ, बेकायदेशीरपणे हत्यारे जवळ बाळगणे, यांसारखे गंभीर व हिंसक गुन्हे केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असतानाही त्यांनी त्याचे उल्लंघन करून गुन्हे केले आहेत. या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन येरवडा पोलिसांकडून संबंधित आरोपींवर ‘मोका’नुसार कारवाई करावी याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला. दरम्यान, चव्हाण यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील पाच महिन्यांत ‘मोका’च्या १८ कारवाया केल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moka action criminal gang yerwada police commissioner amitabh gupta action five months pune print news amy
First published on: 27-05-2022 at 15:21 IST