scorecardresearch

मोसमी पाऊस दोन दिवसांत केरळमध्ये

अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

मोसमी पाऊस दोन दिवसांत केरळमध्ये
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अंदमानात दाखल झालेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडू, बंगालच्या उपसागरच्या काही भागात पोहोचण्यास सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पुढील दोन दिवसांमध्ये मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आणि मोसमी पावसाला अडथळा ठरणाऱ्या मेकुनू चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दरवर्षी साधारणत: १ जूनच्या सुमारास मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होत असतो. मागील वर्षी तो ३० मे रोजी म्हणजे दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा तो चार दिवस आधीच म्हणजे २८ मे रोजीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण, गोव्याची किनारपट्टी आदी भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात तुरळक पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. केरळला मोसमी पावसाचे वेध लागले असतानाही राज्यात विदर्भामध्ये उन्हाचे चटके कायम आहेत. या भागात अद्यापही उष्णतेची लाट असून, बहुतांश भागातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे नोंदविले जात असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2018 at 01:39 IST

संबंधित बातम्या